कवठेकर प्रशालेच्या इयत्ता पाचवी उन्हाळी वर्गाला विद्यार्थ्यांच्या उस्फुर्त प्रतिसादात प्रारंभ व इन्फोसिस पुणे तर्फे विद्यार्थ्यांना प्रदान केलेल्या संगणक संच दालनाचे दिमाखात उद्घाटन
- pespandharpur
- May 3
- 1 min read
पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशाला नाथ चौक,पंढरपूर येथे सोमवार दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी कवठेकर प्रशालेच्या परंपरेनुसार इयत्ता 5 वी च्या नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा उन्हाळी वर्गास अत्यंत उत्साहात प्रारंभ करण्यात आला.यासाठी नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी उत्स्फूर्तपणे व रंगीबेरंगी वेशभूषेत दाखल झाले होते यासाठी कवठेकर प्रशालेमध्ये स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये साधारणतः दीडशे विद्यार्थ्यांनी प्रथम दिवशीच उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली शाळेप्रती आस्था प्रकट केली. यासाठी कार्यक्रमाला विशेष अभ्यागत म्हणून पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानदसचिव श्री सु र पटवर्धन उपस्थित होते यावेळेस त्यांच्याहस्ते नवीन प्रवेश घेतलेल्या दीडशे विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही वाय पाटील यांनी केले आपल्या भाषणामध्ये त्यांनी प्रशालेच्या गौरवशाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती उत्पात- कुलकर्णी यांनी केले.
Comments