top of page

कवठेकर प्रशालेमध्ये रोटरी क्लब पुणे यांच्या सहकार्याने मुलींच्या बहुमजली आद्ययावत स्वच्छतागृहाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न

  • pespandharpur
  • Apr 15
  • 2 min read

पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशाला नाथ चौक,पंढरपूर येथे गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी रोटरी क्लब पाषाण पुणे यांच्यावतीने आद्ययावत व वैशिष्ट्यपूर्ण अशा खास मुलींसाठीच्या दुमजली स्वच्छतागृहाचे भूमिपूजन पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव श्री सु.र.पटवर्धन व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वैशालीताई पटवर्धन यांच्या हस्ते पार पडले.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही. वाय. पाटील यांनी केले.यामध्ये त्यांनी या प्रकल्पाबाबतची गरज व उपलब्धता याची माहिती सर्व उपस्थितांसमोर मांडली. व रोटरी क्लब पुणे यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली . तद्नंतर या कार्यक्रमासाठी पुण्याहून आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व रोटरीचे मान्यवर सर्वश्री श्री अमित भदे,श्री अमेय धोत्रे,श्री मिलिंद कुलकर्णी, श्री अभय सावंत,श्री विजय रेखी,श्री धनंजय राजुरकर या सर्वांचा सत्कार पंढरपूर एज्युकेशन सोसायटी मानद सचिव श्री सु. र. पटवर्धन त्याचबरोबर अध्यक्ष श्री नाना मालक कवठेकर संस्थेचे पदाधिकारी श्री एस. पी. कुलकर्णी व डॉ श्री मिलिंद जोशी व श्री ऋषिकेश उत्पात यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर आपल्या अध्यक्षिय भाषणामध्ये रोटरीचे प्रमुख मान्यवर श्री अमेय धोत्रे यांनी प्रशालेच्या प्रगतीविषयी प्रशंसोद्गार काढले 75 वर्षे पूर्ण केलेल्या या संस्थेमध्ये आम्हास समाजउपयोगी कार्य करण्यास मिळते आहे याचा खूप खूप आनंद व अभिमान आहे व ही सर्व श्री विठ्ठलाचीच कृपा आहे असे भावपूर्ण उद्गार त्यांनी यावेळेस काढले त्याचबरोबर रोटरी क्लब पाषाण पुणे याचे अध्यक्ष श्री अमित भदे यांनीही आपल्या भाषणामध्ये रोटरी क्लब ही विश्वव्यापक संघटना असून विशेषता शैक्षणिक कार्याला भरघोस सहकार्य करणारी ही संस्था असल्याचे त्यांनी नमूद केले व त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या मुलींसाठीच्या स्वच्छता ग्रहाला भरघोस आर्थिक मदत केली असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या भाषणामध्ये पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव श्री सु.र.पटवर्धन यांनी रोटरीच्या सर्व मान्यवरांना त्यांनी दिलेल्या भरघोस योगदानाबद्दल प्रथमतः ऋण व्यक्त केले व या स्वच्छतागृहाची गरज व आपली भूमिका विशद करताना पंढरपूर सारख्या एका तीर्थक्षेत्रामध्ये पुण्याच्या रोटरी क्लबने येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भरघोस सहकार्य देऊन हा उपक्रम राबिविल्याबद्दल त्यांचे हृदयस्थ आभार मानले यामध्ये त्यांनी श्री धनंजय राजूरकर व श्री चंद्रशेखर राजूरकर बंधुद्वयांचे विशेष योगदान आहे असा उल्लेख आवर्जून केला. कार्यक्रमाची सांगता प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ शु.सु. विश्वासे यांच्या आभारप्रदर्शनाने झाली.या कार्यक्रमास प्रशालेचे पर्यवेक्षक,सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात आवर्जून उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.भंडारकवठेकर यांनी केले.





 
 
 

Comments


bottom of page