top of page
अध्यापक विद्यालय, पंढरपूर. 

             पंढरपुरात प्राथमिक शिक्षकात प्रशिक्षित शिक्षकांचे प्रमाण फारच कमी होते या भागांमध्ये अशा प्रशिक्षित शिक्षकांची नितांत गरज होती. ही गरज ओळखून आणि योग्य ती परवानगी मिळवून 20 जून 1947 रोजी संस्थेने ट्रेनिंग कॉलेज सुरू केले. एका आठवड्याच्या आतच पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या दोन स्वतंत्र शाखा पंढरीत सुरू झाल्यामुळे पंढरपूरकरांना विशेष कौतुक वाटले. ट्रेनिंग कॉलेजचे पहिले प्रिन्सिपल म्हणून कै. बा. रा. रत्नपारखी यांची संचालक मंडळांनी नेमणूक केली. तर प्राध्यापक म्हणून कै. त्रिं. स. अभ्यंकर, कै. गो. दि. भाळवणकर, कै. पु. बा. भार्गवशास्त्री यांनी अध्यापनाचे काम केले. ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन म्हणजे आजचे अध्यापक विद्यालय. डीएड कॉलेज, जुनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन ही नवीन नावे. हे कॉलेज काही काळ ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन अंड वुमेन म्हणून नामांकित होते. त्यावेळी महिला या कॉलेजमध्ये प्रशिक्षणासाठी येण्यास सुरुवात झाली. अध्यापक विद्यालयाचे परीक्षा निकाल नेहमीच 90 ते 100 प्रतिशत असतात 100 प्रतिशत ही मर्यादा अनेक वेळा ओलांडली आहे. याचे श्रेय संस्थेचे प्राचार्य, सहकारी प्राध्यापक व कर्मचारी यांचेकडे जाते. सध्या संस्था स्वतःचे इमारतीत भरत असून स्वतंत्र वस्तीगृह आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थेतर्फे प्राथमिक शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे वर्ग चालू असतात. विद्यार्थ्यांच्या पाठ सरावासाठी पंढरपुरात परिसरातील शाळा तसेच पंढरपुरातील शाळांचा समावेश असतो. आमच्या अध्यापक विद्यालया मधून प्रशिक्षण घेतलेले छात्र शिक्षक महाराष्ट्र राज्यांच्या विविध शाळांमधून कार्यरत असून आपल्या विद्यालयाचा नावलौकिक वाढवत आहेत. याशिवाय काही विद्यार्थी एमपीएससी, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण असून वर्ग-१,  वर्ग-२ पदावर कार्यरत आहेत.

H R Vaghmare, Principal, BEd College, Pandharpur

मा. डॉ. श्री. एच. आर. वाघमारे

प्राचार्य

laLFkslkBh vkiys vkfFZkd ;ksxnku egRokps vkgs ++ + +

PANDHARPUR EDUCATION SOCIETY

Bank : BANK OF INDIA, (Pandharpur Branch)

Account Number : 071710100013920

IFSC CODE : BKID0000717

​ आयकर खाते कलम क्रमांक ८० जी नुसार आपण आम्हाला दिलेली मदत आयकरमुक्त राहील.

bottom of page