top of page
द. ह. कवठेकर प्रशाला, पंढरपूर.

            पंढरपूर शहराचा वाढता विकास लक्षात घेऊन, संचालक मंडळाने दूरदृष्टीकोन ठेवून आणि उपनगरातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून स्टेशन रोड परिसरामध्ये द. ह. कवठेकर प्रशालेची स्थापना करून त्या भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय केली. शासनाने त्यास नवीन हायस्कूलची मान्यता दिल्यानंतर कै. गो. दि. भाळवणकर सर हे पहिले मुख्याद्यापक झाले. आज या प्रशालेमध्ये सुमारे ३१ वर्ग असून २००० चे वर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या प्रशालेचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे संगणकाची स्वतंत्र प्रयोगशाळा व तंत्र विभाग असून त्याची स्वतंत्र इमारत आहे. येथे विविध तंत्र विषयाच्या कार्यशाळा असून त्या कार्यशाळेमध्ये आधुनिक उपकरणाच्या आणि यंत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तंत्र विषयाचे प्रशिक्षण दिले जाते. 

V M Kulkarni, Mukhyadhyapak, DKP

मा. श्री. व्ही. एम. कुलकर्णी

मुख्याध्यापक​​​​​​​​​​​

द. ह. कवठेकर प्रशालेची वैशिष्ट्ये

द. ह. कवठेकर प्रशाला ही आपली शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा टिकवण्याचा व वाढविण्याचा नेहमीच प्रयत्न करीत आहे.  या प्रशालेला दहावीच्या निकालाची उज्वल परंपरा असून प्रशालेचे निकाल हे नेहमीच 98 टक्के पेक्षा अधिक असतात तर 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थी संख्या ही नेहमीच 35 पेक्षा अधिक असते. 

भव्य क्रीडांगण असणारी द.ह.कवठेकर प्रशाला ही शहरातील एक नामवंत शाळा असून या प्रशालेला 22000  चौरस फुटाचे प्रशस्त क्रीडांगण आहे. या प्रशालेतील विद्यार्थी आजपर्यंत तालुका, जिल्हा विभागीय व राज्यस्तरीय खेळामध्ये सहभागी झाले आहेत. 

द.ह.कवठेकर प्रशालेची आयसीटी लॅब सुसज्ज व अद्यावत असून संगणक, एलसीडी प्रोजेक्टर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अद्यावत ज्ञान दिले जाते.

द.ह. कवठेकर प्रशालेत शिष्यवृत्ती परीक्षा, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा, एनटीएस परीक्षा, गणित प्रज्ञाशोध परीक्षा,  यासारख्या परीक्षांना विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते व त्याचे स्वतंत्र वर्ग घेतले जातात.  दरवर्षी स्कॉलरशिप मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 25 पेक्षा अधिक आहे. 

प्रशालेत शासकीय चित्रकला परीक्षांचे वर्ग घेतले जातात. व त्यात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते.

टिळक  महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजी विषयाच्या सर्व परीक्षा प्रशालेत आयोजित केल्या जातात.  त्यांचे स्वतंत्र वर्ग घेतले जातात.  

प्रशालेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी संस्थेने स्वतंत्र वॉटर फिल्टर प्लांट बसवला असून संस्थेतील 2500 विद्यार्थ्यांना शुद्ध जल पुरविले जाते.

प्रशालेचे ग्रंथालय सुसज्ज असून अनेक दुर्मिळ ग्रंथ, पुस्तके, संदर्भकोश यांचा समावेश आहे. 

द.ह. कवठेकर प्रशालेचे सांस्कृतिक कार्यक्रम हे नेहमीच दर्जेदार व उठावदार होतात. त्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. कार्यक्रमाची विशिष्ट थीम घेतली जाते व त्यानुसार भारतीय संस्कृती, सण, उत्सव, देशप्रेम यासारखे विषय घेऊन कार्यक्रमाची बांधणी केली जाते. 

प्रशालेचा क्रीडा दिन दरवर्षी मोठ्या दिमाखात साजरा होतो.  विद्यार्थ्यांना मैदानी खेळासाठी प्रोत्साहन दिले जाते.

गीतमंच कार्यक्रमांमध्ये प्रशालेतील 1600 विद्यार्थी दरवर्षी  सहभागी होतात व नवीन सुमारे 8 ते 10 गीतांचे गायन व पठण करतात.

विद्यार्थ्यांना भारतीय सण,संस्कृती, उत्सव, परंपरा याची माहिती व्हावी यासाठी गणेशोत्सव,दहीहंडी, शिवजयंती, नागपंचमी,भोंडला,  यासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात व त्यातून विद्यार्थ्यांना भारतीय परंपरा,संस्कृती यांची माहिती दिली जाते.

दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी व प्रशालेचे निकाल चांगले लागावेत यासाठी टॅलेंट बॅचचे आयोजन केले जाते.

शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, माता-पालक संघ, परिवहन समिती, शाळा समिती या सर्व समित्यांचे गठन केले असून त्यांच्या नियमित सभा घेतल्या जातात व विद्यार्थी हिताच्या योजना राबविल्या जातात.

इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाद्वारे मध्यान भोजनाचे नियोजन केले जाते.

प्रशालेच्या परंपरेनुसार सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व संयोजन प्रशालेतील विद्यार्थी करतात. त्यातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाच्या गुणाचा विकास होतो.

इयत्ता पाचवीपासून सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करणारी द.ह. कवठेकर प्रशाला ही जिल्ह्यातील पहिली शाळा आहे व आज या प्रशालेतील पाचवी ते दहावीपर्यंतचे बहुतांशी वर्ग सेमी इंग्रजी माध्यमाचे आहेत.

एस.एस.सी बोर्ड, पुणे मार्फत दहावीच्या संस्कृत विषयात विशेष गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल दिला जाणारा जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती चा मान प्रशालेला प्राप्त झाला.

कबड्डी, रायफल शूटिंग, कॅरम, कराटे या क्रीडा प्रकारांना प्रशालेला राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.

कोविड लसीकरण, जनगणना, मतदार नोंदणी, निवडणुका यासारख्या सर्व शासकीय उपक्रमामध्ये प्रशालेचे शिक्षक सहभागी होतात.

विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या सर्व संवर्गातील, सर्व प्रकारच्या शासकीय शिष्यवृत्ती यांचे लाभ विद्यार्थ्यांच्या  खात्यावर थेट जमा होतात.

द.ह. कवठेकर प्रशालेतील तज्ञ व अनुभवी शिक्षकांचा राज्यस्तरीय शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रमात नेहमीच सहभाग असतो.

बदलत्या तंत्रज्ञानानुसार काळाची गरज ओळखून द.ह. कवठेकर प्रशालेचे सर्व शालेय व कार्यालयीन कामकाज संगणकीकृत करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार तज्ञ व अनुभवी समुपदेशक  यांचे मार्गदर्शन वर्ग घेण्यात येतात.

पंढरपूर शहरातील बहुतांशी डॉक्टर्स, अभियंते, विधिज्ञ, नगरसेवक, व्यावसायिक हे आमच्या प्रशालेचे माजी विद्यार्थी आहेत. याचा प्रशालेत सार्थ अभिमान आहे.

 

laLFkslkBh vkiys vkfFZkd ;ksxnku egRokps vkgs ++ + +

PANDHARPUR EDUCATION SOCIETY

Bank : BANK OF INDIA, (Pandharpur Branch)

Account Number : 071710100013920

IFSC CODE : BKID0000717

​ आयकर खाते कलम क्रमांक ८० जी नुसार आपण आम्हाला दिलेली मदत आयकरमुक्त राहील.

bottom of page