पंचम संगीत विद्यालय, पंढरपूर.
आध्यात्मिक विद्यापीठ असलेल्या श्री क्षेत्र पंढरी नगरीचा संगीताच्या क्षेत्रातही खूप मोठा नावलौकिक आहे. आज पंढपूर मध्ये संगीताचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आहे. यामध्ये पंढरपूर एज्युकेशन सोसायटीने शालेय शिक्षणाबरोबरच संगीत शिक्षणाचे दालन खुले केले आहे. पंढरपूर एज्युकेशन सोसायटीची स्थापना ज्या पांच गुरुवर्यांनी केली, त्यांचे स्मरण व संगीतातील एक प्रमुख स्वर म्हणून “पंचम” या नावाने संस्थेने प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी व पंढरपूर परिसरातील सर्वांसाठी पंचम संगीत विद्यालय संस्थेचे मानद सचिव श्री. सुधीर पटवर्धन सर यांचे प्रेरणेने चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा दिनांक १६ मार्च २०२३ रोजी सुरु केले आहे.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई चे परीक्षा केंद्र म्हणून सुमारे दोन दशके कवठेकर प्रशाला काम पहात आहे. याद्वारे पंढरपूर व परिसरातील सर्व संगीत शिक्षण घेणारे विद्यार्थी दर वर्षी या केंद्रावर संगीताची परीक्षा देत असतात. परंतु आता या बरोबरच कवठेकर प्रशालेमध्येच शास्त्रीय व सुगम संगीत शिकविण्याची सुविधा पंचम संगीत विद्यालय मार्फत उपलब्ध करून दिली आहे.
शास्त्रीय संगीतामध्ये शास्त्रीय गायन, तबला वादन, हार्मोनियम वादन, भारत नाट्यम, कथ्थक असे विषय असून सुगम संगीताचा वेगळा विभाग केला आहे. त्यामध्ये सुगम गायन, हार्मोनियम, सिंथेसायझर असे विषय आहेत. प्रत्येक विषयासाठी आठवड्यातून दोन दिवस मार्गदर्शन केले जाते. यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संगीतकार व गायक श्री. विनोद शेंडगे, श्री, राजेश खिस्ते, श्री. उमेश केसकर व अन्य तज्ञ प्रशिक्षक काम पाहत आहेत.
या संगीत विद्यालयात गांधर्व महाविद्यालयाचा प्रारंभिक ते संगीत विशारद पर्यंतचा संपूर्ण अभ्यासक्रम यामध्ये शिकविला जातो. विविध मान्यावरांची शिबिरे, संगीत सभा यांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कलेची जोड देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधणे या उद्देशाने पंचम संगीत विद्यालय वाटचाल करत आहे.
laLFkslkBh vkiys vkfFZkd ;ksxnku egRokps vkgs ++ + +
PANDHARPUR EDUCATION SOCIETY
Bank : BANK OF INDIA, (Pandharpur Branch)
Account Number : 071710100013920
IFSC CODE : BKID0000717
आयकर खाते कलम क्रमांक ८० जी नुसार आपण आम्हाला दिलेली मदत आयकरमुक्त राहील.