कवठेकर प्रशाला, नाथ चौक, पंढरपूर.
कवठेकर प्रशाला, नाथ चौक येथे आज ४१ वर्ग असून सुमारे २००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षणशास्त्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार शाळेची तीन माजली सी आकाराची इमारत आहे. जवळपास ३० पेक्षा जास्त खोल्या असून विज्ञान विषयासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा आहे. स्वतंत्र ग्रंथालय असून त्याचा लाभ प्रशालेतील विद्यार्थी त्याचप्रमाणे शिक्षक पण घेत आहेत. प्रशालेमध्ये देखणा कलामंच असून याचा उपयोग शाळा, संस्था त्याचप्रमाणे शिक्षक, ख्यातनाम संस्था, त्यांचे कार्यक्रम करण्यासाठी उपयोग करतात. यामुळेच पंढरपूरकर नागरिक आणि शाळा यामधील सहकार्य वाढतच आहे.
मा. श्री. व्ही. वाय. पाटील
मुख्याध्यापक,
कवठेकर प्रशालेची वैशिष्ट्ये
इयत्ता दहावीच्या निकालाची चढती कमान. बोर्डाच्या गुणवत्ता यादीमध्ये पंढरपूर शहरांमधील सर्वाधिक विद्यार्थी 100% गुण मिळवणारे विद्यार्थी. अनेक विद्यार्थ्यांना विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांचे कडून राज्यस्तरावर पारितोषिक मिळवणारे विद्यार्थी. शाळेमधील आणि संस्थेमधील बहुसंख्य शिक्षक एससीआरटीच्या विविध समित्यांवर कार्यरत. शाळेमधील बहुसंख्य शिक्षक हे पुणे बोर्ड यांच्याकडे परीक्षक नियामक आणि मुख्य नियामक म्हणून कार्यरत. काही शिक्षकांचे बालभारती आणि इतर सरकारी शालेय पुस्तक निर्मितीमध्ये योगदान. राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर विविध विषयांचे शिक्षक तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यरत. पुणे विभागातील इयत्ता दहावीचे कॉपीमुक्त आणि उत्कृष्ट परीक्षा केंद्र म्हणून नावलौकिक. शाळेतील सर्व शिक्षक तंत्रस्नेही असून कोरोना काळामध्ये जवळपास सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन तास घेतले. कित्येक शिक्षकांचे youtube चॅनेल आजही कार्यरत. क्रीडा क्षेत्रामधील आमचा दबदबा आजही कायम. शहर तालुका जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये आमचे विद्यार्थी नेहमीच चमकतात. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांचे तालुक्यातील एकमेव यशस्वी परीक्षा केंद्र. या परीक्षांमधून यशस्वी झालेले विद्यार्थी आज राष्ट्रभर संगीत आणि नृत्याचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत. नृत्य नाट्य सिनेमा आणि छोटा पडदा त्याचप्रमाणे आजकाल चर्चेत असणाऱ्या youtube चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत. या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना शाळेमधून पोषक वातावरण आणि उत्तम मार्गदर्शन. महाराष्ट्र राज्य कला संचालनालय मुंबई यांचे कडून घेतल्या जाणाऱ्या चित्रकला परीक्षांचे परीक्षा केंद्र शाळेत असून त्यातून महाराष्ट्राचे भावी चित्रकार घडवण्याचे काम शाळा करीत आहे. इयत्ता दहावी पर्यंत असणाऱ्या केंद्र शासनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग आणि नजरेत भरणारे यश हे आमचे वैशिष्ट्य. या स्पर्धा परीक्षांमध्ये नवोदय विद्यालय एन एम एम एस परीक्षा टीटीएस परीक्षा एनटीएस परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी घेतली जाणारी स्कॉलरशिप परीक्षा यांचा समावेश. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांचे कडून घेतला जाणाऱ्या विविध इंग्रजी परीक्षांचे मार्गदर्शन आणि परीक्षा केंद्र आमच्या प्रशालेत. महाराष्ट्र हिंदी महाराष्ट्र भाषा सभा पुणे यांचे मार्फत हिंदी विषयाच्या घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे मार्गदर्शन आणि परीक्षा केंद्र. संस्कृत विषयाच्या घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे मार्गदर्शन आणि परीक्षा केंद्र. आमचे विद्यार्थी आज सामाजिक शैक्षणिक राजकीय वैद्यकीय न्याय भारतीय सेनादल संरक्षण संशोधन कृषी बँकिंग इत्यादी क्षेत्रात सर्वोच्च पदावर कार्यरत
कवठेकर प्रशाला (नाथचौक) पंढरपूर एस.एस.सी.परीक्षा- फेब्रु.2022-23 विशेष योग्यता प्राप्त विद्यार्थी :- 1) चि.भंडारकवठेकर निखिल नरेंद्र--- 98.00% 2) कु.पाटील वेदांतिका संजय---95.60% 3) कु.उत्पात सिद्धी अभय---95.40% 4) चि.उत्पात ध्रुव ऋषिकेश ---95.00% 5) चि. सप्ताश्व गंधर्व महेश --- 94.80% 6) कु.हरदास श्रावणी ऋषीकेश---94.40% 7) कु.हत्तीगोटे ऐश्वर्या किशोर---94.20% 8) चि.लाळे हर्षद दिगंबर---94.20% 9) कु.काटकर स्वामिनी सुहास---93.80% 10) कु.मेटकरी वैभवी औदुंबर---93.40% 11) कु. उत्पात आसावरी अनिरुद्ध ---93.20% 12) कु.गुजराथी निधी पुरुषोत्तम---92.60% 13) कु. जोशी गौरी वैभव ---92.40% 14) कु.झरकर कृष्णाई सुहास---92.40% 15) चि. केसकर दत्तप्रसाद राहुल---92.40% 16) चि. लोळगे वरद प्रमोद---92.20% 17 )कु. दीक्षित श्रुती संतोष---91.80% 18) कु. जाधव समीक्षा संजय---90.60% 19) कु.शिंदे श्रुती राजू---90.40% 20) कु.म्हमाने मानसी संतोष---90.20% 21) चि.बाड संग्राम शिवाजी---90.00% 22) कु.उत्पात स्वराली अमोल---89.60% 23) कु.शिरसीकर अवनी सागर---89.40% 24) चि.सादिगले कृष्णा संतोष---89.40% 25 )कु. अभंगराव अक्षता अनिल---89.00%
laLFkslkBh vkiys vkfFZkd ;ksxnku egRokps vkgs ++ + +
PANDHARPUR EDUCATION SOCIETY
Bank : BANK OF INDIA, (Pandharpur Branch)
Account Number : 071710100013920
IFSC CODE : BKID0000717
आयकर खाते कलम क्रमांक ८० जी नुसार आपण आम्हाला दिलेली मदत आयकरमुक्त राहील.