top of page

द.ह. कवठेकर प्रशाला व पंचरत्न इंग्लिश मीडियम तर्फे विमान दुर्घटना पिडितांना श्रद्धांजली अर्पण💐💐💐💐💐💐💐

  • pespandharpur
  • Jun 14
  • 1 min read

पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह.कवठेकर प्रशाला व पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूल यांचा प्रवेश पूर्व आज पहिलाच दिवस संपन्न झाला. यावेळी नुकत्याच अहमदाबाद येथे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनकडे निघालेल्या विमानाला भीषण अपघात झाला व त्यातील 242 नागरिकांना दुर्दैवी मृत्यू आला. यांना संस्थेच्या वतीने श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी द. ह. कवठेकर प्रशाला व पंचरत्न इंग्लिश मीडियमचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व पंचरत्नचे विद्यार्थी उपस्थित होते प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही एम कुलकर्णी सर यांनी विमान अपघाताबाबत व दुर्घटनेबाबतची माहिती दिली. संस्कृत शिक्षक श्री राजेश खिस्ते सर यांनी उपनिषदातील श्लोक म्हणून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. व्ही. एम. कुलकर्णी सर उप मुख्याध्यापक श्री एम. आर. मुंडे सर पंचरत्न इंग्लिश मीडियम च्या मुख्याध्यापिका सौ. मोहोळकर मॅडम, संस्थेचे लेखनिक श्री भैय्या उत्पात, शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित होते.

ree

 
 
 

Comments


bottom of page