पंढरपूर एज्युकेशन सोसायटी साठी 45 लॅपटॉपची भेट तसेच डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या वतीने सॅनिटरी पॅड वेंडिंग आणि डिस्पोजल मशीन भेट.
- Feb 19
- 1 min read
पंढरपूर एज्युकेशन सोसायटी या सोलापूर जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्थेसाठी जुन्नर येथील श्री सागर ताजने तसेच धनंजय राजूरकर यांच्या सहकार्याने 45 लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे त्याचबरोबर लॅपटॉपच्या साह्याने अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी हा प्रयत्न करण्यात आल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी याप्रसंगी केले. गेली 75 वर्षाहून अधिक पंढरपूर एज्युकेशन सोसायटी हे संस्था मराठी माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा खूप चांगला प्रयत्न करीत आहे. विद्यालयामध्ये असलेल्या संगणकांची संख्या लक्षात घेता विद्यार्थ्यांना अधिकच चांगल्या पद्धतीने आणि प्रभावी पद्धतीने संगणक शिक्षण उपलब्ध करण्यासाठी विद्यालयातर्फे श्री सागर ताजणे व धनंजय राजुरकर यांच्याकडे संगणक उपलब्धतेबाबत मागणी करण्यात आली होती. नुकतेच झालेल्या कार्यक्रमांमध्ये या लॅपटॉपचे हस्तांतरण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूर या ठिकाणी करण्यात आले. या लॅपटॉपच्या उपलब्धतेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अधिक सोयीचे होणार असल्याचे प्रतिपादन पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री पटवर्धन सर यांनी व्यक्त केले आहे.
याच कार्यक्रमांमध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या वतीने देखील पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या दोन्ही शाळांसाठी दोन सॅनिटरी पॅड वेंडिंग आणि डिस्पोजल मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या मशीनच्या उपलब्धतेबद्दल विद्यार्थिनी आणि पालकांनी खूप समाधान व्यक्त केले आहे.
तसेच याप्रसंगी डिसेंट फाउंडेशन पुणे चे अध्यक्ष सन्माननीय जितेंद्र बिडवई सचिव फकीर आतार, ज्येष्ठ संचालक आदिनाथ चव्हाण पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे संचालक पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
या पुढील कालखंडात देखील संस्थेसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन श्री सागर ताजने व जितेंद्र बिडवई यांनी केले.





Comments