
इयत्ता 10वी (एस.एस.सी)च्या फेब्रुवारी 2023-2224मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून आपली दैदिप्यमान निकालाची परंपरा याहीवर्षी अखंडितपणे चालू ठेवली.प्रशालेचा निकाल 95.47%
इतका लागला असून त्यामध्ये 35 विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.

प्रशालेचे प्रथम तीन गुणवंत-
प्रथम क्रमांक :- कु.आर्या अजित माने
गुण :- 98.40 %
द्वितीय क्रमांक :- कु.स्वरा मोहन यादव
गुण:- 98.20 %
तृतीय क्रमांक :- चि.सार्थक सुहास हरीदास
गुण:-97.80% गुण
124 विद्यार्थी विशेष प्रविण्यांनी उत्तीर्ण झाले.व संस्कृत विषयात 9 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण प्राप्त केले.

सोमवारी दिनांक 27 मे रोजी प्रशालेत ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यावर प्रथम तीन क्रमांकांच्या गुणवंतांचा सत्कार पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव श्री सु.र.पटवर्धन यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वि. या.पाटील,उपमुख्याध्यापक श्री नृ.बा.बडवे,पर्यवेक्षक श्री सु.शि.रुपनर,संस्थासदस्य श्री शां.पां.कुलकर्णी व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

प्रशालेच्या उत्तम नियोजन व अंमलबजावणी मुळे हे भव्य यश मिळाले.या यशासाठी पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री नानामालक कवठेकर, चेअरमन वीणाताई जोशी,मानद सचिव श्री सु.र.पटवर्धन,श्री सु.त्रि. अभ्यंकर,श्री शां.पां.कुलकर्णी,श्री संजय कुलकर्णी डॉ.श्री मिलिंद जोशी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी अभिनंदन केले आहे.
Comments