पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशालेत एस एस सी परीक्षा मार्च 2023 मध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त 25 विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा नुकताच पार पडला.
कार्यक्रमाची सुरवात प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वि. या.पाटील यांच्या स्वागत व प्रस्ताविकाने झाली.यामध्ये त्यांनी प्रशालेच्या गुणवंताप्रती गौरवपर मनोगत व्यक्त करुन भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.तद्नंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख अभ्यागत व पंढरपूर पंचायत समितीचे विस्तारधिकारी श्री लिगाडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पहार व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशास कष्टाची जोड असल्याचे स्पष्ट केले.पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव श्री सु.र.पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशासाठी अभ्यासात सातत्य,श्रम व समर्पण या त्रिसूत्रीचा आवलंब करण्यास प्रशालेच्या विद्यार्थ्यांना आवाहन केले.प्रशालेचे ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री सु.शि. रुपनर,पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री नानामालक कवठेकर, सदस्य डॉ.श्री मिलिंद जोशी, श्री हृषीकेश उत्पात,श्री संजय कुलकर्णी, श्री अभिषेक सातारकर आवर्जून उपस्थित होते.
गुणवंतांच्या वतीने काही विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करून याचे सर्व श्रेय प्रशालेच्या सर्व शिक्षकवृंदाना देऊन कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचा समारोप प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री न.बा. बडवे यांच्या आभारप्रदर्शनाने झाला.तर सूत्रसंचालन ज्योती कुलकर्णी-उत्पात यांनी केले. या कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक,प्रतिष्ठित नागरिक व प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते.
Comments