top of page

कवठेकर प्रशालेच्या स्मरणिका,काचफलक व अत्याधुनिक दूरचित्रवाणी संचाचे अनावरण

पंढरपूर एज्युकेशन सोसायटीची कवठेकर प्रशाला ही सतत विद्यार्थीभिमुख व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते.त्याचाच एक भाग म्हणून आज आवर्जुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही वाय.पाटील यांनी करून विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांचा विकास होण्यासाठी या उपक्रमांची गरज प्रतिपादित केली.

नुकत्याच महाराष्ट्र शासन पुरस्कृत शिक्षण सप्ताहास विद्यार्थ्यांच्या अलोट प्रतिसादात संपन्न झालेल्या विविध उपक्रमांनी संपन्न व प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री राजुरकर व श्री गुरव यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक तयार केलेल्या आकर्षक स्मरणिकेचे प्रकाशन पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानदसचिव श्री सु.र.पटवर्धन व पंढरपूर नगरपालिका शिक्षण विभागाचे समन्वयक श्री बोडरे यांच्या हस्ते संयुक्तपणे करण्यात आले.


विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या कविता, लेख, चित्रकला, एकांकिका किंवा अनेक प्रहसने यांच्या आविष्कारास एक समर्थ व्यासपीठ मिळावे म्हणून प्रशालेच्या प्रत्येक विविध मजल्यांवर आकर्षक अशी सहा काचफलके त्याचबरोबर पुणे रोटरी क्लब पुणे यांच्यातर्फे 43 इंची अत्याधुनिक,शैक्षणिक सुविधांनी युक्त असा अँड्रॉइड दूरचित्रवाणी संच पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव श्री सु.र.पटवर्धन यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना समर्पित करण्यात आला.


यावेळी विद्यार्थ्यांसमोर केलेल्या आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी आधुनिक जगात विद्यार्थ्यांना सर्वांगीण ज्ञान मिळविण्यासाठी आपल्या आवडी,छंद व विज्ञान जोपासून यांच्याशी जवळीक केलीच पाहिजे असे प्रतिपादन केले.


यावेळी पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी श्री एस.पी.कुलकर्णी,प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ एस आर कुलकर्णी तसेच शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष श्री अमोल घाटे हेही यावेळी आवर्जुन उपस्थित होते.कार्यक्रमाचा समारोप ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री एस एस रुपनर यांच्या आभारप्रदर्शनाने झाला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते.



63 views0 comments

Comments


bottom of page