पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशालेस रॉयल रायडर्स नाशिकचे समन्वयक डॉ.श्री आबासाहेब पाटील यांनी कवठेकर प्रशालेस सोमवार दिनांक 29 एप्रिल रोजी सदिच्छा भेट दिली.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही.वाय.पाटील यांनी प्रारंभी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख अभ्यागत डॉ श्री आबासाहेब पाटील व त्यांच्या सर्व कुटुंबीयांचे स्वागत करून डॉ पाटील यांच्या सायकालिंग च्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली.
आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात डॉ श्री आबासाहेब पाटील यांनी आपण मागील पंचवीस वर्षांपासून सायकलिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रभर भ्रमंती करून गड, किल्ले व अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविले यांची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली व उत्तम शरीरासाठी उत्तमपणे सायकल चालवून शरीर व मन यांची अतिशय उत्कृष्ट पणे बांधणी करू शकतो हे अनेक उदाहरणे देऊन पटवून दिले व अधिकाधिकपणे सायकलचा वापर करण्याचे आवाहन केले.तदनंतर डॉ श्री सुविद्य पत्नी सौ वैशाली पाटील व सहकुटुंबिय सौ सारिका देसले यांनीही आरोग्याचे महत्व स्पष्ट करून अत्यंत काटेकोरपणे व्यायाम व आभ्यास यांचा सहसंबंध विशद केला.डॉ श्री आबासाहेब पाटील यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही.वाय.पाटील यांनी तर सौ पाटील व सौ देसले यांचा सत्कार ज्येष्ठ शिक्षिका सौ चुंबळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचा समारोप ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री सु.शि.रुपनर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.या कार्यक्रमास इयत्ता दहावी उन्हाळी वर्गाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर बंधू आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री ना.गो.कुलकर्णी यांनी केले.
Comentários