कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही.वाय.पाटील यांना कृतिशील मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर
- Pes Pandharpur
- Nov 26, 2024
- 1 min read

हार्दिक अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन !
महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती यांच्यांतर्फे दरवर्षी प्रदान करण्यात येणारा राज्यस्तरीय मुख्याध्यापकांनी केलेल्या विशेष उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून कृतिशील मुख्याध्यापक हा पुरस्कार देण्यात येतो.यावर्षीचा हा सन्मान पुरस्कार कवठेकर प्रशालेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री व्ही.वाय.पाटील यांना जाहीर झाला आहे.याबद्दल आज त्यांचा हृदयसत्कार पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानदसचिव श्री सु.र.पटवर्धन सर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व कर्मचारी बंधु-भगिनी यांनी श्री मुख्याध्यापक श्री पाटील सर यांचे अभिनंदन केले आहे.💐💐

Comments