पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशालेत दिनांक 15 एप्रिल ते 15 मे या दरम्यान प्रशालेत इयत्ता पाचवीत नव्याने प्रवेश घेतलेल्या व इयत्ता 10 वी विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांचा पाया मजबूत होण्यासाठी म्हणून विशेष उन्हाळी वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.प्रशालेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला विद्यार्थी व पालकांनी अत्यंत उस्फुर्त प्रतिसाद दिला. आज दिनांक 15 मे रोजी याचा समारोप अत्यंत दिमाखदार कार्यक्रमाने झाला.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वि.या.पाटील यांनी केले व उन्हाळी वर्गाची गरज स्पष्ट केली.
यावेळी पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव श्री सु.र.पटवर्धन व आदर्श बाल व प्राथमिक मंदीर च्या मुख्याध्यापिका सौ माया सांगोलकर प्रमुख अभ्यागत म्हणून आवर्जून उपस्थित होते.
आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सौ सांगोलकर यांनी विद्यार्थ्यांना आपला शारीरिक व मानसिक संवर्धनासाठी नियोजनबद्ध अभ्यासाची गरज प्रतिपादित केली तर श्री पटवर्धन यांनी भविष्यातील कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांनी उत्तम आभ्यास,छंद व कला जोपासण्याची गरज व्यक्त केली व प्रशालेच्या संगीतशाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी उन्हाळी वर्गाबद्द्ल अत्यंत उस्फूर्तपणे मनोगते व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी उन्हाळी वर्गात घेण्यात आलेला चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धेत उत्तम यश मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख अभ्यागतांच्या हस्ते शालेय भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.इयत्ता 10 वी उन्हाळी वर्गास एकही दिवस गैरहजर न राहिल्याबद्दल 5 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
तदनंतर प्रमुख अभ्यागत श्री सु.र.पटवर्धन यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वि. या.पाटील यांच्या हस्ते तर मुख्याध्यापिका सौ सांगोलकर यांचा सत्कार प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ एडगे यांचे हस्ते करण्यात आला. ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री सु.शि. रुपनर यांनी उपस्थित अभ्यागतांचे आभार व्यक्त केले व सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका सौ एडगे यांनी केले. केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी परिश्रम घेतले.
Comments