पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशालेत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाची इयत्ता 5 वी च्या नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व औक्षण करून झाली.यावेळी शाळेचे मुख्यप्रवेशद्वार व सर्व वर्गांना फुलांच्या माळा व अत्यंत सनईच्या मांगल्य सुरात,सर्व फलकांवर विविध विद्यार्थी प्रेरित चित्रे व विचार विद्यार्थ्यांच्या आनंदात भर घालीत होते.
शासकीय आदेशानुसार या वर्षी च्या विद्यार्थ्यांचे स्वागत प्रशालेत अत्यंत आनंदाने व जल्लोषात करण्यात आले.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वि. या.पाटील यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन व प्रशालेच्या शिक्षकभगिनींनी औक्षण करून झाले.त्याचबरोबर उपमुख्याध्यापक श्री न.बा बडवे,ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री सु.शि.रुपनर व ज्येष्ठ शिक्षिका सौ शु.र.कुलकर्णी त्याचबरोबर पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री नानामालक कवठेकर,सचिव श्री सु.र.पटवर्धन सदस्य डॉ. श्री मिलिंद जोशी,गतवर्षीचे पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष ह.भ.प.श्री बडवे महाराज यासर्वांच्या हस्ते नूतन विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले.
आपल्या प्रस्ताविक व स्वागतपर भाषणात मुख्याध्यापक श्री वि. या.पाटील यांनी मोबाइल व त्यांचे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना सजग केले.ह.भ.प.प्रसादमहाराज बडवे यांनी आपल्या आशीर्वादपर मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना प्रशालेत आपल्याला यशाचा व उन्नतीचा मार्ग दाखविणाऱ्या प्रशालेच्या गुरुप्रति सतत नम्र राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आभार ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री रुपनर यांनी मानले.व सूत्रसंचालन श्री शिवाजी मेडशिंगीकर यांनी केले. या स्वागत समारंभास प्रशालेचे आवार विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने व रंगीबेरंगी वेशभूषेने फुलून गेला होता.या समारंभास मोठया संख्येने पालक बंधू-भगिनी,प्रशालेचे शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
Comments