पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह .कवठेकर प्रशालेत भारताची यशस्वी चांद्रयान मोहीम 2023 यावर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.व्ही.एम. कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर रंजक माहिती दिली.
यावेळी त्यांनी इस्त्रोची स्थापना कशी झाली, आजपर्यंत भारताने राबविलेल्या तीन चांद्रयान मोहिमा, प्रगत राष्ट्रांच्या चांद्रयान मोहिमा, चांद्रयान मोहिमेमध्ये वापरण्यात आलेले तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, विक्रम लँडर, प्रज्ञा रोवर चांद्रयानाचा प्रवास, प्रवासातील अडचणी व त्यावर मात याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी प्रशालेतील सकाळ-सत्राचे 750 विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी श्री नितीन अवताडे सर यांनी प्रास्ताविक केले.
ज्येष्ठ शिक्षक श्री. जी. एस. पवार सर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमास पंचरत्न इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका सौ.मोहोळकर मॅडम उपमुख्याध्यापक आर.जी.केसकर सर उपस्थित होते.
Comments