पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित द ह कवठेकर प्रशाला, अध्यापक विद्यालय, पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल, आदर्श बाल व प्राथमिक मंदिर येथे स्वातंत्र्य दिन संयुक्तरित्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री. नाना कवठेकर प्रमुख अभ्यागत डॉक्टर सुखदेव कारंडे, प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही एम कुलकर्णी, यांच्या हस्ते व सर्व मान्यवर यांचे समवेत ध्वजवंदन करण्यात आले.
प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही एम कुलकर्णी यांनी सर्व क्रांतीवीरांचे स्मरण केले. स्वातंत्र्यानंतर भारतीयांनी केलेली प्रगती व भविष्यातील संधी या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
प्रमुख अभ्यागत डॉक्टर कारंडे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे सदस्य एस पी कुलकर्णी ,डॉक्टर मिलिंद जोशी ,संजय कुलकर्णी ,जवान रोहन देशमुख, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष पत्रकार मंदार लोहकरे, सहसचिव दिपाली सतपाल, शाळा व्यवस्थापनाचे उपाध्यक्ष डॉक्टर कलढोणे, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वाघमारे, पंचरत्न च्या मुख्याध्यापिका सौ. मोहोळकर आदर्श बाल व प्राथमिक प्रमुख देशपांडे, पर्यवेक्षक श्री मुंडे, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी उपस्थित होते, प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री आर जी केसकर यांनी आभार मानले
Comments