top of page

द. ह .कवठेकर प्रशालेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरापंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित द ह कवठेकर प्रशालेत भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेचे मा मुख्याध्यापक श्री व्ही एम कुलकर्णी सर यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला


या प्रसंगी पंढरपूर एज्युकेशन सोसायटी पंढरपूरचे सदस्य डॉक्टर श्री मिलिंद जोशी, श्री ज्ञानेश कवठेकर श्री.संजय कुलकर्णी तसेच प्रशालेचे माजी विद्यार्थी व प्रशालेच्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री मंदार लोहकरे सहसचिवा सौ दिपाली सतपाल हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.अमृत महोत्सवी प्रजासत्ताक वर्षात देशाने आज पर्यंत केलेल्या प्रगतीचा आढावा मुख्याध्यापक श्री व्ही एम कुलकर्णी सर यांनी मांडला व देशापुढील आव्हाने व विद्यार्थ्यांची कर्तव्य याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.


यावेळी प्रशालेच्या 1991 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या ग्रंथालयास अनमोल असे ग्रंथ व डिस्ट्रॉयर मशीन भेट दिली. याप्रसंगी प्रशालेचे मा.पर्यवेक्षक श्री मुंढे सर ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री जी एस पवार , श्री आर एस कुलकर्णी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजप्रतिज्ञा श्री राजेश धोकटे सर यांनी दिली उपस्थित मान्यवरांचे आभार उपमुख्याध्यापक श्री.आर.जी. केसकर सर यांनी मानले श्री प्रशांत मोरे व श्री समीर दिवाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले33 views0 comments

Comments


bottom of page