पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द. ह. कवठेकर प्रशालेमध्ये दीपावली निमित्त विद्यार्थ्यांची पर्यावरण पूरक आकाश कंदील बनविण्याची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत प्रधालेतील सुमारे 125 बालकलाकार सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना या कार्यशाळेमध्ये आकाश कंदील बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले व विद्यार्थ्यांनी स्वनिर्मितीचा आनंद घेऊन सुबक आकाश कंदील बनविले व कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद दिला. कार्यशाळेसाठी ज्येष्ठ कलाशिक्षक श्री विलास जोशी सर, श्री अमित वाडेकर सर, सौ. पूनम दळवी मॅडम यांनी परिश्रम घेतले.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही. एम. कुलकर्णी सर उपमुख्याध्यापक श्री आर. जी. केसकर सर पर्यवेक्षक श्री एम आर मुंडे सर व ज्येष्ठ शिक्षक श्री जी. एस. पवार सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. गेली अनेक वर्षे सातत्याने द.ह.कवठेकर प्रशाला हा उपक्रम राबवीत असून त्यास उत्तम प्रतिसाद आहे.
Comments