द.ह.कवठेकर प्रशालेमध्ये श्रावण मासातील पहिला सण नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थिनी कु. अनुष्का पाटोळे हिने हिंदू संस्कृतीतील नागपंचमी या सणाची माहिती व निसर्ग संवर्धन व प्राण्यांच्या पूजेचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमासाठी सर्व सकाळ सत्र च्या चिमुकल्या छान पारंपरिक वेशभूषेत आल्या होत्या. मुलींनी पारंपारिक गीतांवर विविध पारंपारिक खेळांचा आनंद घेतला.
प्रशालेचे मा.मुख्याध्यापक श्री .व्ही. एम. कुलकर्णी सर तसेच उपमुख्याध्यापक श्री. आर. जी .केसकर सर प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. मुंडे सर यांनी मुलींना नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सकाळ सत्रच्या सर्व महिला भगिनींनी कार्यक्रमाचे नियोजन उत्तम केले. कार्यक्रमाचा समारोप नागपंचमीनिमित्त मुलींच्या खाऊ वाटपाने झाला.
Kommentarer