पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह. कवठेकर प्रशालेत आज शासकीय उपक्रमानुसार आनंददायी शनिवार साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेतील शिक्षक श्री संजय रामा गवळी सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना झुंबा डान्स शिकविला. यावेळी विविध देशी खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
या सर्व उपक्रमात विद्यार्थी मुक्तपणे सहभागी झाले होते.
प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. आर. एस. कुलकर्णी सर, श्री डी. बी.पाटोळे सर श्री.एम.बी.कुलकर्णी सर सौ. वर्षा मोरे मॅडम, श्री प्रीतम पवार सर, श्री. वेळापूरे सर श्री संजय गवळी सरसह सर्व शिक्षक शिक्षिका यांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही एम कुलकर्णी सर उपमुख्याध्यापक श्री एन बी बडवे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
Comments