पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशाला,द.ह.कवठेकर प्रशाला,अध्यापक विद्यालय, आदर्श बाल प्राथमिक विद्यामंदिर व पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूल या सर्व शैक्षणिक शाखांच्या विद्यार्थ्यांचा सामूहिक गायनाचा अविस्मरणीय कार्यक्रम पंढरपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात नवीन इतिहास रचणारा ठरला.
पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शैक्षणिक शाखांमधून जवळपास साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस अत्यंत आनंददायक,जोशपूर्ण,ताला- सुरात आपला स्वराविष्कार सादर केला.
पंढरीच्या शैक्षणिक क्षेत्रात या घटनेची सुवर्णअक्षराने नोंद होईल.आत्यंतिक राष्ट्रनिष्ठेने व गर्वाने निर्मित महान गीतकरांची गीते विद्यार्थ्यांनी अत्यंत तन्मयतेने गाऊन द.ह.कवठेकर प्रशालेचे प्रांगणात म्हणजे जणू काही राष्ट्रप्रेमाचा महान उत्सवच सुरू असल्याचे वाटत होते.
या सुवर्णक्षणांचे साक्षीदार व प्रमुख अभ्यागत होण्याचे भाग्य महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त श्री सुरज मांढरे यांना लाभले.कार्यक्रमाचा प्रास्तविक संस्थेचे मानदसचिव श्री सु.र.पटवर्धन यांनी करून आपल्या मनोगतात या उपक्रमागची संस्थेची भूमिका व गरज प्रतिपादन केली.
द.ह.कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वि. मा.कुलकर्णी यांनी आभ्यागतांचा परिचय करून दिला.शिक्षण आयुक्त श्री सूरज मांढरे आपल्या व्यस्त कार्यातून आवर्जून उपस्थित राहिले.
संस्थेच्या ज्येष्ठ माजी कलाशिक्षक कै.श्री वीरेंद्र जोशी चित्रकला दालनात विविध शाखेतील साडेचारशे विद्यार्थ्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
तद्नंतर विद्यार्थ्यांच्या स्वराविष्कार या कार्यक्रमाला प्रारंभ झाला व त्यातील सर्व गीते तन्मयतेने व आवडीने ऐकून आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या.त्यांनी विद्यार्थ्यांशी साधलेल्या आभ्यागतीय संवादातून अनेक गीतांच्या स्फूर्तिदायक ओळींचा संदर्भ घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले.ज्ञान, आचार,विचार,संस्कार,संस्कृती व वर्तन यावर प्रत्येक नागरिकाचे व राष्ट्राचे भविष्य आवलंबून असून राष्ट्र उभारणीच्या कार्यात विद्यार्थी व शिक्षक हे दोन घटक म्हणजे पायाच असल्याचे संबोधित केले.
संस्थेचे सदस्य व मुंबई उच्चन्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ श्री श्रीनिवास पटवर्धन यांनीही विद्यार्थ्यांशी अत्यंत मनमोकळेपणाने संवाद साधून चैतन्य निर्माण केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री नानामालक कवठेकर यांच्याहस्ते प्रमुख अभ्यागतांचा शाल,श्रीफळ,हार,व भेटवस्तू प्रदान करून सन्मान करण्यात आला.
व्यासपीठावर यानिमित्ताने सोलापूर जिल्हा प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सौ तृप्तीताई अंधारे, पंढरपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री मारुतीराव लिगाडे व अनेक शासकीय अधिकारी, संस्थेच्या सर्व शाखांचे प्रमुख,त्याचबरोबर संस्थेचे सर्व सदस्य श्री संजय कुलकर्णी,श्री शांताराम कुलकर्णी,डॉ.श्री अनिल जोशी श्री पाठक सौ पटवर्धन मॅडम,श्रीमती पाठक मॅडम,पालक शिक्षक संघांचे सर्व पदाधिकारी हे कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वि. या.पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
विद्यार्थ्यांना यासर्व गीतांचे बहुमोल मार्गदर्शन पंढरीचे ज्येष्ठ संगीतकार व गायक श्री विनोद शेंडगे व त्यांचे सहकारी श्री राजेश खिस्ते,श्री उमेश केसकर व श्री देशपांडे यांचे लाभले.
यावेळी पंढरीतील प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार आवर्जून उपस्थित होते सर्व शाखांचे प्रमुख त्याचबरोबर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी यासाठी विशेष श्रम घेतले.
Commentaires