पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशालेत सोमवार दिनांक 10/07/2023 रोजी तालुका विधी सेवा समितीतर्फे कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले.
बदलती सामाजिक स्थिती व स्थित्यंतरे यावर आधारित या एकदिवसीय शिबिरास विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता.
कार्यक्रमाचा प्रारंभ प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही.वाय.पाटील यांच्या स्वागत व परिचयाने झाला.यात त्यांनी विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना या कायद्याचे ज्ञान व जाणीव करून देण्यासाठी या शिबिराची नितांत गरज प्रतिपादन केली.अधिवक्ता संघाचे अध्यक्ष श्री अर्जुन पाटील यांनी हे शिबीर विद्यार्थीकेंद्रित असल्याचे नमूद केले. बालविवाह व पालकांची भूमिका यावर आधारीत स्फूर्तीदायक चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखवून विद्यार्थ्यांनी अत्यंत उस्फूर्तपणे प्रतिक्रिया व्यक्त केल्या.पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव श्री सु.र.पटवर्धन यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात याशिबिराद्वारे सामाजाने आपली भूमिका बदलण्याची गरज विशद केली.
अध्यक्षीय मार्गदर्शनपर मनोगतात जिल्हा दिवाणी न्यायाधीश श्री एम.आर.कामत यांनी मुली,महिला व पालक यांनी आपल्या कुटुंबात व मुलांमध्ये सुसंवाद साधण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचा समारोप ज्येष्ठ शिक्षिका सौ.एस आर कुलकर्णी यांच्या आभारप्रदर्शनाने झाला.या कार्यक्रमास अधिवक्ता संघाचे उपाध्यक्ष श्री सागर गायकवाड, सदस्य श्री यारगट्टीकर,श्री वाघमारे,श्री नंदकुमार देशपांडे, श्री महेश भोसले,श्री आल्लापूरकर हे आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री एन.जी.कुलकर्णी यांनी केले.
Comentários