top of page

कवठेकर प्रशालेत स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

  • Pes Pandharpur
  • Aug 19, 2023
  • 1 min read

पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशालेत देशाचा ७७वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

ree


स्वच्छ गणवेशातील विद्यार्थ्यांनी सकाळी ७.०० वाजल्यापासूनच प्रशालेचे प्रांगण फुलून गेले होते.ठीक ७.३०वाजता पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव श्री सु.र.पटवर्धन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी संस्थेचे सदस्य व मुंबई उच्चन्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता श्री श्रीनिवास पटवर्धन हे आवर्जून उपस्थित होते.


ree

यानंतर ध्वजास मानवंदना देऊन राष्ट्रगीत,झेंडागीत व राज्यगीत तबला,पेटीवर सादर झाले.प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वि. या. पाटील यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक करून विद्यार्थ्यांना संस्कारक्षम आचरणाची गरज व देश महासत्ता बनण्याची भावना व्यक्त केली.

ree

ree

ree

प्रशालेच्या परंपरेनुसार आजच्या दिवशी इयत्ता ५ वी ते १० वी पास विद्यार्थ्यांना जवळपास ७५००० रुपयांचे रोख बक्षिसांचे वाटप सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे मुख्य अभ्यागत श्री पटवर्धन यांनी आपल्या संदेशपर अभिभाषणात विद्यार्थ्यांना राष्ट्रनिष्ठा व त्याची कर्तव्ये यांची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमास जवळपास 1500 विद्यार्थी मोठ्या आनंदात व नव्या उमेदीने सकाळपासून हजर होते.

ree

या कार्यक्रमाला शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष ह.भ.प.श्री नामदास महाराज,सहसचिवा सौ धनश्री उत्पात माजी ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती पाठक मॅडम


शहरातील प्रतिष्ठित नागरिक प्रशालेचे सर्व शिक्षक बंधू-भगिनी,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मेडशिंकर तर रोख बक्षीस वाचन श्री भंडारकवठेकर यांनी केले.

 
 
 

Comments


bottom of page