top of page

आज कवठेकर प्रशालेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.V Y पाटीलसर यांच्या उपस्थितीत ,पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव आदरणिय श्री.S R पटवर्धनसर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष ह.भ.प. श्री नामदासमहाराज,सहसचिवा सौ.धनश्रीताई उत्पात,आदर्शबाल व प्राथमिक मंदीरच्या मुख्याध्यापिका सौ.सांगोलकर मॅडम व त्यांचा सर्व स्टाफ,कवठेकर प्रशालेचा सर्व स्टाफ व सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या प्रसंगी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.V Y पाटीलसर यांनी केले.मुलांना प्रजासत्ताक व संविधान,देशाचा तिरंगा या बद्दल सविस्तर माहिती सांगितली व देशाची लोकशाही बळकट ठेवण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी सक्षम राहण्याचे अवाहन केले. उपाध्यक्ष श्री.नामदास महाराज यांनी ही आपल्या गोड वाणीमधुन देशप्रेम व तिरंगा झेंडा व स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे अवाहन केले.मानद सचिव श्री.पटवर्धनसर यांनी मुलांनी भविष्याचे डाॅक्टर,शिक्षक ,ईंजिनियर,जवान बनुन देशाची प्रामाणिकपणे सेवा बजावण्याचे अवाहन केले
39 views0 comments

Comments


bottom of page