सकाळसत्रात गोकुळाष्टमी मोठया उत्स्फूर्तपणे साजरी झाली यानिमित्त भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे प्रशालेचे ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री रुपनर यांच्या हस्ते करण्यात आले तर श्री.पी.एम. गवळी सर यांनी मुलांना हिंदीमधुन श्रीकृष्णाची माहिती अत्यंत भक्तीमय माहिती सांगितली .पर्यवेक्षक श्री रुपनर सर यांनी त्यांचा सत्कार करुन अभिनंदन केले.यावेळी सकाळ सत्राचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.
आज प्रशालेमध्ये गोकुळाष्टमीनिमित्त कार्यक्रम संपन्न झाला. दुपार सत्र मध्ये कार्यक्रम प्रसंगी पर्यवेक्षक श्री. रुपनर सर यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी इयत्ता नववीतील विद्यार्थिनींनी विष्णू सहस्त्रनाम म्हटले. ज्येष्ठ शिक्षिका सौ. एस आर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती ज्योती उत्पात मॅडम यांनी श्रीकृष्णांच्या चरित्रातील कथा अतिशय सुंदर रीतीने कथन केल्या.
श्री रुपनर सर यांनीही मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री . एन.जी. कुलकर्णी सर यांनी केले.
Comments