राज्यस्तरीय कराटे असोसिएशन तर्फे पुणे(धायरी)येथे पार पडलेल्या चौदा वर्षाखालील वयोगटातील कराटे स्पर्धेत कवठेकर प्रशालेच्या बाजी मारून सांघिक उपविजेतेपद आपल्याकडे खेचून आणले.
या स्पर्धेत राज्यातील विविध शाळेच्या संघांनी सहभाग नोंदविला होता तथापि कवठेकर प्रशालेच्या तेरा जणांच्या चमूने उपविजेता संघावर आपली विजयी मोहोर उमटवून वर्चस्व सिद्ध केले.यामध्ये तेरा विद्यार्थी-विद्यार्थीनींना स्पर्धापदक,प्रमाणपत्र व संघास करंडक बहाल करण्यात आले होते या सर्वांचा सत्कार कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वि. या.पाटील व पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव श्री सु.रा.पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला व संघास मिळालेल्या करंडकाचा स्वीकार मा.मुख्याध्यापक यांनी केला.
यावेळी प्रशालेचे ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री सु.र.रुपनर,क्रीडा विभाग प्रमुख श्री मा.भा. गडदे,ज्येष्ठ इंग्रजी विभागप्रमुख श्री ना.गो.कुलकर्णी व मार्गदर्शक श्री भोसले उपस्थित होते.संघाच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहेत.
Comments