पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशालेच्या कु.काव्यांजली श्रीकांत पेंडाल हिची महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाच्या जलसंधारणाचे महत्व याविषयीच्या निबंध स्पर्धेत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.
महाराष्ट्र शासनातर्फे कु काव्यांजलीला रुपये रोख एकवीस हजार,सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार होणार आहे.
याबद्दल कु काव्यांजली हिचा सत्कार कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वि.या.पाटील यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व भेटवस्तू देऊन करण्यात आला.यावेळी तिचे पालक,उपमुख्याध्यापक श्री बडवे व ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री रुपनर व पर्यवेक्षिका सौ विश्वासे,तिचे मार्गदर्शक शिक्षक-शिक्षिका श्री नकाते व सौ जाधव प्रशालेचे विद्यार्थी व सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कु.काव्यांजलीच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments