पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशालेत सणांचा राजा असलेल्या श्रावण महिन्याचे स्वागत नागपंचमी सण मोठया पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरे करून करण्यात आले.प्रथम ज्येष्ठ शिक्षिका सौ.शु.र.कुलकर्णी, सर्व शिक्षिका व विद्यार्थीप्रतिनिधी यांनी नागोबाच्या प्रतिमेचे पूजन केले.
सौ.प्राजक्ता उत्पात यांनी श्री गणपती व श्री नागोबाची कहाणी व त्याकथेमागील हेतू विशद केला.श्रीमती ज्योती उत्पात-कुलकर्णी यांनी हे सर्व सण व संस्कृती यांचा मानवी जीवनाशी विविध पद्धतीने संबध स्पष्ट केला ज्यामध्ये आर्थिक, सामाजिक,धार्मिक, नैसर्गिक व इतर बाबींचा समावेश होता.
इयत्ता पाचवी ते दहावीच्या मुलींनी पारंपरिक पद्धतीचे खेळ,नाच गाणी,व फुगड्या जोशात सादर करून वातावरणात श्रावण महिना आल्याची ग्वाही दिली.अत्यंत तालासुरात गायलेल्या गाण्याला विद्याथिनींनी सुंदर पदलालित्याची पखरण करीत फेर धरत प्रशालेचा अवघा आसमंत आनंदाने बहरून टाकला.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भारतीय संस्कृतीचा तेजस्वी भाव मोठया अभिमानाने ओसंडून वाहत होता.
या कार्यक्रमाची उल्लेखनीय बाब म्हणजे प्रशालेच्या सर्व शिक्षक-भगिनी अत्यंत आनंदात व भावोत्कट होऊन विद्यार्थ्यांनीनी बरोबरीने यामध्ये सहभागी झाल्या. कुठेही थोरामोठ्याचा फरक न ठेवता प्रशालेच्या शिक्षक-भगिनी आपलेपणाने हा कार्यक्रम पार पाडला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मोहिते यांनी केले.व हा कार्यक्रम प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वि. या.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
Comments