आज दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी कवठेकर प्रशालेमध्ये शिक्षक पालक सभा संपन्न झाली. या सभेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. जवळपास साडेसहाशे पालकांच्या उपस्थितीत ही पालक सभा संपन्न झाली.
संस्थेचे सन्माननीय सेक्रेटरी श्री पटवर्धन सर, पंचम संगीत विद्यालयाचे श्री विनोद शेंडगे सर, शिक्षक पालक संघाच्या सहसचिवा सौ धनश्री उत्पात मॅडम उपस्थित होत्या.
गीता जयंतीनिमित्त भगवद्गीता ग्रंथाचे व श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सन्माननीय मुख्याध्यापक पाटील सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या शिस्तीबाबत मार्गदर्शन केले.
शिक्षक पालक संघाच्या सचिवा सौ मोहिते मॅडम यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत सांगितला.
पर्यवेक्षिका सौ एस आर कुलकर्णी मॅडम यांनी द्वितीय सत्रातील कार्यक्रमाच्या नियोजनाविषयी व कामकाजाविषयी माहिती दिली.
श्री विनोद शेंडगे सर यांनीपंचम संगीत विद्यालय विविध कोर्स आणि स्पर्धे विषयी व संगीत कलेविषयी मार्गदर्शन केले.
सन्माननीय श्री पटवर्धन सर यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील करियर संबंधी पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विज्ञान प्रदर्शनामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या चि. योगीराज कदम यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षक पालक संघाच्या सहसचिवा सौ उत्पात मॅडम यांनीही शाळेतील कामाविषयी कौतुक केले. प्रशालेचे सन्माननीय उपमुख्याध्यापक श्री बडवे सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक श्री भंडार कवठेकर सर यांनी केले.
Comentarios