पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या
कवठेकर प्रशाला नाथ चौक वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दिमाखात साजरा झाला.प्रशालेच्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या जवळपास साडेतीनशे विद्यार्थ्यांना यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अभ्यंगतांनी विविध भेटवस्तू व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमासाठी पुणे येथील रोटरीचे पदाधिकारी
सन्माननीय श्री व सौ कोल्हटकर
श्री व सौ देशपांडे
सौ स्मिता शहा
मीनल अवचट
श्री धनंजय राजूरकर
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रशालेत आगमन झाल्यावर सनईच्या मंगल स्वरात,प्रशालेच्या बॅंडपथकांनी स्वागत-धून वाजवून मानवंदना दिली व पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. सर्व अभ्यंगतांनी आवर्जून सर्व प्रशालेच्या सर्व विभागांना अतिशय आस्थेने भेट देऊन समाधान व्यक्त केले.प्रारंभी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक,स्वागत व पाहुण्यांचा परिचय प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही. वाय.पाटील यांनी करून दिला.पारितोषिक वितरण कार्यक्रमादरम्यान श्री.विनोद शेंडगे व श्री.उमेश केसकर यांनी पेटी व तबल्यावर अतिशय मधुरतेने गीतमंचची गीते सामूहिक सादर करुन अभ्यंगतांना मंत्रमुग्ध केले.पारितोषिक वितरणचा कार्यक्रम श्री.एन.जी. कुलकर्णी व श्री शेखर राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.पी.पी.कुलकर्णी,सौ.प्राजक्ता उत्पात,सौ.शुभांगी एडगे,सौ.सुहासिनी वळवी,श्री.विशाल गुरव यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण करून प्रशालेच्या जवळपास पस्तीस स्पर्धेत साडेतीनशे विद्यार्थ्यांना व त्यातील अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय विजेत्यांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ ममता कोल्हटकर यांनी प्रशालेच्या दैदिप्यमान परंपरेची व विद्यार्थ्यांच्या स्पर्धेतील सहभागाची मुक्त कंठाने प्रशंसा केली व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सौ.मीनल अवचट यांनीही आपल्या भाषणात विद्यार्थी व प्रशालेच्या शिस्तबद्दल गौरवोद्गार काढून आनंद व्यक्त केला.यावेळी पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानदसचिव श्री सु. र.पटवर्धन यांनी प्रशालेच्या एकूण वाटचालीचा धावता आढावा घेऊन भावी दिशा स्पस्ट केली.यावेळी प्रमुख आभ्यागतात रोटरियन श्री सचिन देशपांडे,श्री धनंजय राजूरकर व श्री जयंत कोल्हटकर हे सर्व पुण्याहून आवर्जून आमंत्रण स्विकारुन उपस्थित राहिले. तर,पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री नानामालक कवठेकर,सदस्य श्री संजय कुलकर्णी, श्री एस.पी.कुलकर्णी व श्री हृषीकेश उत्पात उपस्थित होते. पर्यवेक्षिका सौ विश्वासे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.व कार्यक्रमाची सांगता अत्यंत सुंदर आशा आवाजात श्री.विनोद शेंडगे यांच्या पसायदानाने झाली. सूत्रसंचालन सौ मोहिते यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेच्या सर्व शिक्षक बंधू भगिनी व सर्व शिक्षकेतर यांनी अपार मेहनत व परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
Comentarios