top of page

कवठेकर प्रशालेत रक्षाबंधन सण साजरा



पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशालेत रक्षाबंधन सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रशालेच्या मागील 50 वर्षांच्या परंपरेनुसार आज प्रशालेत विद्यार्थ्यांना राखी बांधून आपल्या अनोख्या भाऊ-बहिणीच्या नात्याची ग्वाही दिली. यावेळी कार्यक्रममाचे प्रास्ताविक व स्वागत प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका

श्रीमती डोळे यांनी केले तर प्रमुख अभ्यागत म्हणून द.ह.कवठेकर प्रशालेचे संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक व शिक्षक श्री राजेश खिस्ते आणि शिक्षक-पालक सभेच्या सहसचिवा सौ.धनश्री उत्पात यांची उपस्थिती लाभली.



पाहुण्यांची ओळख श्रीमती ज्योती उत्पात-कुलकर्णी यांनी करून दिली.पाहुण्यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वि.या.पाटील व ज्येष्ठ शिक्षिका सौ.शु.र.कुलकर्णी यांनी केला.अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी आपली या सणांच्या बाबतीत दिलखुलास मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या राखी बांधण्याच्या कार्यक्रमाला सुरवात होऊन विद्यार्थिनींनी आपल्या भावांना व उपस्थित अभ्यागतांनाही अत्यंत आनंदाने राख्या बांधल्या.श्री राजेश खिस्ते यांनी आपल्या मनोगतात या सांस्कृतिक वारश्याला जपण्याची गरज प्रतिपादन केली .




यावेळी सर्व विद्यार्थी बहिणींनी आपल्या भावांना अत्यंत आनंदात राख्या बांधल्या.व भावांनीही आपल्या बहिणींना त्यांचे रक्षण करण्याची ग्वाही दिली.कार्यक्रमाची सांगता ज्येष्ठ शिक्षिका सौ.शु.र.कुलकर्णी यांच्या आभारप्रदर्शनाने झाली व हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती डोळे,सौ.तरळगट्टी,सौ मोहिते श्रीमती ज्योती उत्पात-कुलकर्णी यांनी विशेष योगदान दिले.कार्यक्रमास प्रशालेचे विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र-संचालन प्रशालेच्या विद्यर्थिनी कु.धृती उत्पात व कु. स्वरांजली कुलकर्णी यांनी केले.





सकाळसत्र रक्षाबंधन कार्यक्रम अत्यंत उस्फूर्त पणे साजरा :

पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशालेत सकाळसत्रचा राक्षबंधनाचा कार्यक्रम अत्यंत उस्फूर्तपणे साजरा झाला. कार्यक्रमाचा प्रारंभ विद्यार्थ्यांच्या स्वागतगीताने झाला व प्रस्ताविक व स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वि. या.पाटील यांनी केला. तर प्रमुख अभ्यागत म्हणून आदर्श बाल व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ माया सांगोलकर या उपस्थित होत्या.



यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते झाला.तद्नंतर सकाळसत्र च्या विद्यार्थ्यांनी शिक्षक-दिन व रक्षाबंधन यावर उस्फूर्त पणे आपली मते नोंदवून सर्वांना मंत्रमुग्ध केले.प्रमुख अभ्यंगतांचा सत्कार ज्येष्ठ शिक्षिका सौ क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला.पारंपरिक प्रथेप्रमाणे सर्व विद्यार्थी बहिणींनी आपल्या सर्व विद्यार्थी भावांना राख्या बांधून सांस्कृतिक एकता दाखवून दिली.


प्रमुख अभ्यागत सौ.माया सांगोलकर यांनी आपल्या बोधप्रद भाषणात विद्यार्थ्यांना आशा भारतीय सणांची व संस्कारांची राष्ट्रास गरज प्रतिपादन केली व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री नृ.बा. बडवे व ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री सु.शि.रुपनर उपस्थित होते.ज्येष्ठ शिक्षका सौ क्षीरसागर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.



हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेच्या शिक्षिका सौ.क्षीरसागर, सौ वळवी, सौ जाधव व सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी परिश्रम घेतले.

7 views0 comments
bottom of page