नुकत्याच पार पडलेल्या 14 वर्षांखालील तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेत कवठेकर प्रशाला,पंढरपूरच्या संघाने तालुकास्तरातून जिल्हास्तरात विजयी घौडदौड कायम राखली.तालुकास्तरात अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या झालेल्या सामन्यात पंढरपूरच्याच अरिहंत पब्लिक स्कुलच्या संघाला नमवून हा विजय मिळविला.याबद्दल कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वि. या.पाटील यांच्या हस्ते प्रस्तुत संघाचा सत्कार करण्यात आला.
आता यापुढील सामना जिल्ह्यास्तरात सोलापूर येथे होणार असून कवठेकर प्रशालेचा संघ जोमाने तयारीला लागला आहे. त्यांना प्रशालेचे क्रिडा शिक्षक श्री.गडदेसर व श्री.सुरेंद्र कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.या दैदीप्यमान विजयाने प्रशालेच्या संघाचा आत्मविश्वास नक्कीच बळावला असून येत्या सामन्यात जिल्हास्तरातूनही विजय मिळवून विभागीय स्तरात जाण्याचा इरादा खेळाडूंनी व्यक्त केला.यावेळी ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री सु.शि. रुपनर व ज्येष्ठ शिक्षिका सौ.शु.र.कुलकर्णी, पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव श्री सु.र.पटवर्धन प्रशालेचे सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी बंधू उपस्थित होते. संघाच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments