top of page

कवठेकर प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या नवरसाने पंढरीवासीय तृप्त

पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशालेत 75 वर्षाची विद्यार्थ्यांवर संस्कार व संस्कृतीची परंपरा प्रशालेने वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने कायम राखली.बुधवार दिनांक 10/01/2024 रोजी सोई साठी सायंकाळी ठीक साडेसहा वाजता खास फक्त विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पंढरीचे ज्येष्ठ संगीततज्ञ डॉ श्री प्रसाद कुलकर्णी व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ स्वाती कुलकर्णी यांच्याहस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आले.
याच कार्यक्रमाचा दुसरा टप्पा खास पालकांसाठी शुक्रवारी 12/01/2024 सायं. प्रशालेत अत्यंत जोशपूर्ण आवेशात विद्यार्थ्यांनी सादर केला.समारंभाचे स्वागत व प्रस्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही. वाय.पाटील यांनी केले तर उद्घाटन पंढरीचे सुप्रसिद्ध मनोविकारतज्ञ व प्रशालेचे माजी विद्यार्थी डॉ श्री तेजस भोपटकर यांच्या हस्ते करण्यात आले


प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी श्री मारुतीराव लिगाडे हे उपस्थित होते' बहार नवरसांची ' या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात मानवाच्या विविध भावनांचा अविष्कार विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे नृत्य व नाट्यरूपाने सादर केला.प्रभावी वेषभूषा, नेत्रदीपक विद्युतरोषणाई, उत्तम पदलालित्य व सादरीकरण यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतदार ठरला.जवळपास दोन ते अडीच तास चाललेल्या कार्यक्रमाने या दोन ते अडीच हजार प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.यावेळी पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे सन्मानीय अध्यक्ष श्री नानामालक कवठेकर,सचिव श्री सु.र.पटवर्धन व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ पटवर्धन,सदस्य डॉ श्री मिलिंद जोशी,श्री एस.पी.कुलकर्णी उपस्थित होते. उपस्थित सर्व अभ्यागतांनी आपल्या मनोगतात कार्यक्रमाविषयी अत्यंत गौरवास्पद भावना व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षिका सौ.शु.सु.विश्वासे यांनी मानले तर सूत्रसंचालन श्री मेडशिंगीकर यांनी केले.

या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर बंधू भगिनींनी परिश्रम घेतले.14 views0 comments
bottom of page