top of page

कवठेकर प्रशालेत सन 2023-24 ची शिक्षक-पालक सभा मोठया उत्साहात संपन्न

  • Pes Pandharpur
  • Jul 12, 2023
  • 1 min read

ree

पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशालेमध्ये मंगळवार दिनांक 11/07/2023 रोजी शिक्षक- पालक सभा मोठ्या उत्साहात पार पडली. सभेचा प्रारंभ सर्व मान्यवरांचे हस्ते सरस्वती पूजनाने झाला.



ree

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही. वाय. पाटील यांनी केले.यामध्ये त्यांनी नवीन शैक्षणिक वर्षातील कामकाजाची रूपरेषा आणि मागील वर्षाच्या शैक्षणिक वर्षाची कामगिरीही पालकांच्या समोर मांडली.सन 2022-23 या वर्षातील पालक सभेचा इतिवृत्त प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ तरळगट्टी यांनी प्रस्तुत केले.त्याचबरोबर सन 2023-24 या नूतन वर्षीच्या पालक सभेची माहिती व तिची रचना प्रशालेच्या सह- शिक्षिका व नूतन सचिवा सौ.मोहिते यांनी स्पष्ट केली.तद्नुसार शिक्षक-पालक सभेचे नूतन उपाध्यक्ष म्हणून ह.भ.प.एकनाथ तुळशीदास महाराज नामदास यांची तर सहसचिवा म्हणून सौ.धनश्री श्रीकांत उत्पात यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.



ree

प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही. वाय. पाटील यांनी मावळते उपाध्यक्ष श्री प्रसाद महाराज बडवे त्याचबरोबर नूतन उपाध्यक्ष श्री एकनाथ तुळशीदास महाराज नामदास व पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानदसचिव सु.र.पटवर्धन यासर्वांचा सत्कार केला.तर नूतन सहसचिवा सौ. धनश्री उत्पात यांचा सत्कार ज्येष्ठ शिक्षिका सौ एस.आर.कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला

ree

ree

अभ्यागतांच्या मनोगतांमध्ये श्री एकनाथ महाराज नामदास यांनी प्रशालेच्या आजपर्यंतच्या कामगिरीचा गौरव पर उल्लेख केला सौ धनश्री उत्पात यांनीही प्रशालेच्या सर्व कार्यात सर्वोतोपरी सहकार्याची ग्वाही दिली.श्री सु.र.पटवर्धन यांनी आपल्या भाषणामध्ये पालक व शिक्षक यांनी विद्यार्थी हा केंद्रस्थानी मानून त्याच्या सर्वांगीण प्रगतीची गरज प्रतिपादित केली व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

ree

कार्यक्रमाचा समारोप उपमुख्याध्यापक श्री न. बा. बडवे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला .तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री नरेंद्र भंडार कवठेकर यांनी केले.या कार्यक्रमास जवळपास सहाशे पालक बंधू-भगिनी उपस्थित होते.व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 
 
 

Comments


bottom of page