विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये स्वारस्य वाढवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी कवठेकर प्रशाला नाथ चौक येथे आज इयत्ता पाचवी सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उदघाटण दहक च्या ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका देशपांडे मॅडम यांच्या हस्ते झाले .
याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही वाय पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञानाचे जीवनातील महत्त्व विशद केले तसेच विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्याचा उद्देश स्पष्ट केला उपस्थित मान्यवरांचे आभार प्रशालेचे जेष्ठ पर्यवेक्षक श्री रुपनर सर यांनी मानले. याप्रसंगी प्रशालेतील सर्व विज्ञान शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे नियोजन श्री राजूरकर सर व श्री गुरव सर यांनी केले.
Comments