आपल्या पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव श्री सु. र. पटवर्धन सर यांना रोटरी क्लब पुणे नॉर्थ यांचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान
- pravinutpat
- Sep 12
- 1 min read
पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव तथा कवठेकर प्रशाला नाथ चौक पंढरपूरचे माजी मुख्याध्यापक श्री सु.र. पटवर्धन यांना पुणे रोटरी क्लब नॉर्थ यांच्यामार्फत लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला.श्री पटवर्धन सर हे शैक्षणिक क्षेत्रातील एक अत्यंत नावाजलेले,अभ्यासू, व ऋषीतुल्य व्यक्तिमत्व म्हणून त्यांची पूर्ण सोलापूर जिल्ह्याला ओळख आहे. आपल्या मुख्याध्यापकपदाच्या आणि सचिवपदाच्या कार्यकाळात त्यांनी पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांमधून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक भरीव कामे केलेली आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये व प्रशासनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुसूत्रता आणून शिक्षण क्षेत्रात अत्यंत मोलाचं व भरीव योगदान दिलेले आहे या कार्याची दखल पुणे रोटरी क्लब ऑफ नॉर्थ पुणे यांनी घेऊन त्यांना लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड (जीवन गौरव पुरस्कार) देऊन 10 सप्टेंबर 2025 रोजी बालकल्याण संस्था पुणे येथे सन्मानित केले . याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.अनेकांनी या पुरस्काराबद्दल बोलताना आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की श्री पटवर्धन सर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल योग्य प्रकारे घेऊन पुरस्काराचा खऱ्या अर्थाने सन्मान झाला.
याप्रसंगी पुणे रोटरी क्लब ऑफ नॉर्थ चे अध्यक्ष श्री मोहन पुजारी,सेक्रेटरी श्री. सुरेश नायर, रोटरीचे डिस्ट्रिक्ट 3131 चे माजी प्रांतपाल श्री रवी धोत्रे, रोटरीचे उपप्रांतपाल श्री धनंजय राजुरकर व पुणे रोटरी चे सर्व पदाधिकारी, पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे सदस्य तथा मुंबई उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट श्री श्रीनिवास पटवर्धन तसेच कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही वाय पाटील सर व त्यांचे सहकारी याप्रसंगी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष श्री नानामालक कवठेकर, चेअरमन श्रीमती विणाताई जोशी सचिव श्री अभ्यंकर सर,संस्थेचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर सर्व शाखेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी श्री पटवर्धन सरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Comments