top of page

कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही वाय पाटील सर यांना रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्यातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

  • pravinutpat
  • Sep 13, 2025
  • 1 min read

कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही. वाय. पाटील यांना पंढरपूर रोटरी क्लब पंढरपूर यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.श्री पाटील सर यांनी प्रशालेच्या आपल्या मुख्याध्यापकपदाच्या कारकिर्दीमध्ये विद्यार्थी केंद्रित धडाडीचे अनेक निर्णय घेतले व ते यशस्वी करून दाखवले त्यामुळे कवठेकर प्रशालीची विद्यार्थी संख्या जवळपास दोन हजाराच्या घरामध्ये आलेली आहे ही त्याची पोचपावती आहे असेच म्हणावे लागेल, त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांसाठी व शिक्षक बंधूंसाठी प्रभावी उपयोग करून प्रशालीची सर्वांगीण प्रगती साधली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत सहयोगाची भावना व विद्यार्थ्यांच्या शाळेच्या प्रगतीला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. याची दखल घेऊन एक उत्तम विद्यार्थी प्रिय शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून पंढरपूर रोटरी क्लब पंढरपूर यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार श्री व्ही. वाय. पाटील यांना सिंहगड कॉलेज पंढरपूर येथे नुकताच प्रदान करण्यात आला.


 
 
 

Comments


bottom of page