पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे कौशल्य विकास केंद्र व युथ बिल्ड फौंडेशन, पुणे यांचे तर्फे द.ह. कवठेकर हायस्कुल येथे महिला उद्योजक मेळावा संपन्न
- pespandharpur
- Jun 14
- 1 min read
MSSIDC,महाराष्ट्र शासन व पंढरपूर एज्युकेशन सोसायटी चे कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने द.ह.कवठेकर प्रशाला येथे महिला उद्योजक मेळावा सम्पन्न झाला. महिलांसाठी सोमवार दिनांक 9 जून 2025 रोजी सकाळी साडे दहा ते साडे चार पर्यंत द.ह.कवठेकर प्रशाला सावरकर पथ पंढरपूर येथे एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तज्ञ मार्गदर्शकानी शासकीय योजनांची माहिती दिली. नवीन व्यवसाय सुरू करणे व मार्केटिंग या विषयावर अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले आणि या कार्यशाळेचे सर्व उपस्थित महिला भगिनींना महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र दिले या मेळाव्याला महिला उद्योजकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. सदर मेळाव्यामध्ये चहा व जेवणाची मोफत सोय करण्यात आलेली होती.आणि सदर प्रशिक्षण हे युथफिल्ड फाउंडेशन MIMA तर्फे देण्यात आले होते. सहभागी असणाऱ्या महिलांनी या प्रसंगी सर्वांचे आभार मानले, व वरचेवर असे कार्यक्रम घेणे विषयी सांगितले, महिला सक्षमीकरण च्या या युगात पंढरपूर एज्युकेशन सोसायटी ने असे स्तुत्य उपक्रम घेतला त्या बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रसंगी संस्थेचे मानद सचिव मा. पटवर्धन सर, व द ह कवठेकर प्रशाले चे मुख्याध्यापक मा. व्ही एम कुलकर्णी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी ज्यानी सहकार्य केले त्यांचे आभार कौशल्य विकास केंद्र चे निदेशक श्री. विनय उत्पात सर यांनी मानले.







Comments