पंढरीच्या शैक्षणिक विश्वात पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशाला व द.ह.कवठेकर प्रशालेंचे व पंचरत्न इंग्लिश मिडी. स्कुलचे इयत्ता 10 वी निकालाने वर्चस्व सिद्ध
- pespandharpur
- May 17
- 2 min read
पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशाला, नाथ चौक व द.ह.कवठेकर प्रशाला, वीर सावरकर पथ या दोन प्रशाला पंढरपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात मागील 76 वर्षांपासून अत्यंत प्रभावी वाटचाल करून पंढरीचे संस्कारक्षम नागरिक घडविण्याचे कार्य अखंडितपणे करीत आहे.मंगळवार दिनांक 13 मे रोजी प्रशालेत इयत्ता 10 वी च्या ऑनलाइन निकाल जाहीर झाला. यामध्ये संस्थेच्या उभय प्रशालेपैकी.....
कवठेकर प्रशाला, नाथ चौक प्रशालेने आपली इयत्ता 10 वी निकालाची उज्वल परंपरा याहीवर्षी कायम राखली. प्रशालेचा निकाल या परीक्षेसाठी 305 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 293 विद्यार्थी उत्तीर्ण झाले प्रशालेचा निकाल 96.06% इतका लागला असून यामध्ये 22 विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. तर 82 विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता प्राप्त केली आहे. संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त 2 विद्यार्थी आहेत.
प्रशालेचे गुणवंत विद्यार्थी :-
● प्रथम क्रमांक- कु.शांभवी औदुंबर ताठे - 97.40%
● द्वितीय क्रमांक- कु.धृती ऋषिकेश उत्पात - 96.00%
●तृतीय क्रमांक- चि. श्रीयोग ज्ञानेश्वर मोरे - 95.80%
द.ह.कवठेकर प्रशाला, वीर सावरकर पथ याही प्रशालेने आपली इयत्ता 10 वी च्या दैदिप्यमान निकालाची परंपरा अखंडितपणे कायम ठेवली. एकूण 223 विद्यार्थ्यांपैकी 220 उत्तीर्ण झाले. प्रशालेचा सरासरी निकाल 98.65% लागला असून 90 टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त 34 विद्यार्थी तर संस्कृत 100 पैकी 100 गुण प्राप्त 1 विद्यार्थी आहे.
प्रशालेचे गुणवंत विद्यार्थी :-
● प्रथम क्रमांक - चि. विनीत विजय शिंदे 99.20%
● द्वितीय क्रमांक- कु. सानिका महेश धर्माधिकारी 97%
●तृतीय क्रमांक - कु. हर्षदा सतीश बुवा 96.80 %
●तृतीय क्रमांक-कु.रिया प्रमोद गायकवाड 96.80 %
संस्था इंग्रजी या विषयाला अधिक महत्त्व देण्यासाठी स्वतंत्रपणे पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल हेही सुरू आहे त्याचा निकाल अत्यंत वाखाण्याजोगा आहे तो खालीलप्रमाणे-
● प्रथम क्रमांक- कु.सेजल महेश कवडे 89.45%
● द्वितीय क्रमांक- कु.मानसी दिनकर गोळे 83.40%
● तृतीय क्रमांक- चि.आर्यन आप्पासाहेब लेंडवे 83.20
या तिन्हीही प्रशालेत सातत्याने वाढती विद्यार्थी संख्या, शिस्त, पालकांचा प्रशालेवर असणारा दृढविश्वास व उच्चशिक्षित अनुभवी शिक्षकवर्ग यांनी प्रभावीपणे केलेले प्रयत्न होय. विद्यार्थीकेंद्रित व गुणवत्तापूर्ण शिक्षण यासर्व बाबी अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत असतात. उभय प्रशालेत रोटरी क्लब पुणे यांच्या विद्यमाने तीन मजली आद्यावत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वच्छतागृह उभारण्यास नुकतीच सुरुवात झाली असून याकामी रोटरीयन श्री धनंजय राजूरकर यांच्या पुढाकाराने हा महत्वाकांक्षी प्रकल्प साकार होत आहे.उभय प्रशालेंना संस्थेचे अध्यक्ष श्री नानामालक कवठेकर त्याचबरोबर चेअरमन श्रीमती विणाताई जोशी, मानद सचिव श्री सु. र. पटवर्धन व सु. त्रिं. अभ्यंकर त्याचबरोबर सर्व संचालक मंडळाचे भरीव पाठबळ व मार्गदर्शन असते यामुळे उभय प्रशाला अत्यंत प्रभावशालीपणे शैक्षणिक क्षेत्रामधला एक आदर्श दीपस्तंभ म्हणून पंढरीच्याच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोलाचे कार्य करीत आहे. उभय प्रशालेच्या इयत्ता 10वी निकालाची चढती कमान खालील तौलनिक माहिती स्तव देत आहोत.
सन 2020 ते 2025 या शैक्षणिक वर्षातील एस.एस.सी.परीक्षेत संस्थेच्या विविध प्रशालेंचे यश खालीलप्रमाणे-




Comments